खास. धैर्यशील माने यांना यशापर्यंत पोहोचवण्यासाठी नव्या जोडण्या….

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खास. धैर्यशील माने यांना यशापर्यंत पोहोचवण्यासाठी शनिवारपासून मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नव्या जोडण्या लावायला आरंभ केला आहे. गत निवडणुकीसारखीच यंदाही ही निवडणूक होईल अशा दृष्टीने त्यांनी हालचालींना गती दिली. शंभर पेक्षा अधिक प्रमुखांशी त्यांनी काल संवाद साधला.