इस्लामपूर शहरामध्ये एका ५५ वर्षीय व्यक्तीने राहत्या घराच्या बाजूला असलेल्या शेडमध्ये दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. हा प्रकार रविवारी सकाळी ११ वाजता उघडकीला आला. राजेंद्र रामचंद्र पाटील (वय ५५) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. ही घटना कुटुंबियांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी तात्काळ राजेंद्र पाटील यांना उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले.
मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालय सूत्रांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पाटील यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी इस्लामपूर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. अधिक तपास सुरु असल्याचे अधिकाऱ्यांकडुन सांगण्यात आले.