मुख्यमंत्री पुन्हा आज कोल्हापुरात…..

कोल्हापूर महायुतीचे कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक आणि इचलकरंजीचे उमेदवार धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शनाने आज सोमवारी उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. शनिवारी कोल्हापुरात आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सायंकाळपासून पहाटे चार पर्यंत लोकसभा निवडणुकीच्या जोडण्या लावण्यामध्ये व्यस्त होते. त्यानंतर ते मुंबईला गेले.

आज सोमवारी ते पुन्हा कोल्हापुरात येणार असल्याने लोकसभा निवडणुकीचे राजकारण गतिमान झाले आहे. आज नेते व कार्यकर्ते गांधी मैदान येथे जमणार आहेत. तेथून शक्ती प्रदर्शनाने सर्वजण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार आहेत. छत्रपती शिवाजी चौक आणि खानविलकर पेट्रोल पंप चौक येथे मनोगत होतील.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक तसेच आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, समरजीतसिंह घाटगे यांची उपस्थिती असणार आहे.


.