आज चंद्रहार पटालांचा प्रचार मेळावा…..

सांगलीतील आज महाविकास आघाडीचाप्रचार मेळावा होणार आहे. या मेळाव्यात राष्ट्रवादी उपस्थित राहणार आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ  महाविकास आघाडीचा मेळावा  म्हणून विष्णूदास भावे नाट्यगृहात आयोजन केलेलं आहे.  दुसरीकडे जिल्ह्यातील प्रमुख  कॉंग्रेस नेते नागपूरला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रभारी रमेश चेन्निथला, नाना पटोले यांनी  कॉंग्रेस नेत्यांना भेटीसाठी निरोप दिल्याची माहिती  राष्ट्रवादी शरद पवार गट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,  विश्वजीत कदम यांनाही  देण्यात आले आहे. मात्र मेळाव्याला न जाण्याची भूमिका काँग्रेसने घेतलीय.  विशाल पाटलांना उमेदवारी जाहीर होण्याची अपेक्षा आणि कार्यकर्त्यांची नाराजी असल्याने मेळाव्याला जाणार नाहीत.  शिवसेना ठाकरे गटाकडून काँग्रेसचे माजी मंत्री सतेज पाटील,माजी मंत्री विश्वजीत कदम यांच्यासह जिल्हा काँग्रेसला मेळाव्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे.