भारतीय जनता पक्षात पक्ष प्रवेश केला व दुसऱ्या दिवसापासूनच वैभव पाटील मतदारसंघाच्या विविध विकास कामाबाबत सक्रिय झाल्याचे दिसून आले. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे सांगलीत आले असता त्यांची भेट घेऊन खानापूर मतदारसंघात टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या कामासंदर्भात चर्चा केली . चालू असलेल्या सहाव्या टप्प्याच्या कामाचा आढावा घेताना परिसरातील शेतकरी , कार्यकर्त्यांचा उपस्थितीत बैठक घेऊन काही सुधारणा असल्यास त्या अंमलात आणाव्यात व टप्याचे काम त्वरित पूर्णत्वास जावे याविषयी पत्रव्यवहार केला. पावसाळा सुरु होत असल्याने कृष्णा- वारणा नदीकाठी पूरस्थिती निर्माण होते यावर उपाय म्हणून भविष्यात कार्याविन्त पाणी योजनांच्या साहाय्याने अधिकचे पुराचे पाणी दुष्काळी भागात सोडण्याविषयी आदेश द्यावेत , अशी विनंती केल्याचे सांगितले .
टेंभूच्या सहाव्या टप्प्यासाठी जलसंपदामंत्राची भेट
