अलीकडच्या काळात उन्हाची तीव्रता खूपच वाढत चाललेली आहे. सर्व मुलांच्या परीक्षा संपल्या की मुलाचा पोह्ण्याकडे जास्त कल दिसून येतो. उष्णतेमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच दहावी व बारावीच्या परीक्षा संपल्याने मुले विहीर, नदीपात्रामध्ये पोहायला जात आहेत, तर नव्याने पोहायला शिकणारे जलतरण तलावामध्ये नोंदणी करीत आहेत. त्यातून महापालिकेच्या जलतरण तलावामध्ये आबाल वृद्धांची गर्दी होत आहे.
विविध शाळा, ॲकॅडमीकडून उन्हाळी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. परिणामी सभासद वाढीमुळे बॅचेसची संख्या वाढवावी लागत आहे.सुरक्षित पोहायला शिकण्यासाठी पालक जलतरण तलवास प्राध्यान्य देतात. इचलकरंजी शहरात दोन जलतरण तलाव असून, सध्या कै. शंकरराव पुजारी हा एकच तलाव सुरू आहे. त्यामध्ये ४५० हून अधिक सभासद आहेत. केवळ एप्रिल महिन्यात नव्याने १०० हून अधिक सभासद नोंदी झाल्या आहेत. मे महिन्यात सुमारे ३५० नव्या सभासदांची नोंदणी होईल, अशा अपेक्षा व्यक्त होत आहेत.