माढ्यामधून अखेर धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपला रामराम ठोकत शरद पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. काल धैर्यशील मोहिते पाटील यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी बोलताना त्यांनी माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते यांच्यावर निशाणा साधत एका रात्रीत तुझे पार्सल बीडला पाठवण्याची ताकद असल्याचा थेट इशारा दिला.
मोहिते पाटलांच्या या इशाऱ्यानंतर आता राम सातपुते यांनीही जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.ही मोदीजींची निवडणूक आहे. त्यामुळं कोणी कुठे ही गेलं तरी जनता मोदीजींसोबत आहे. मी एक सामान्य शेतकरी ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे. त्यामुळे एका गरीब घरात जन्माला आलेल्या कार्यकर्त्याला हिनवण्याचे काम ही लोक करत आहेत. येत्या 4 तारखेला सोलापूरकरांनी ठरवलेलं आहे माझं पार्सल दिल्लीला पाठवायचे आहे,” असा पलटवार राम सातपुते यांनी केला आहे.