देशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे सक्षम नेतृत्व असणे गरजेचे आहे.महायुतीच्या उमेदवाराला मत म्हणजे मोदींना, पर्यायाने विकासाला आहे. खासदार धैर्यशील माने यांना मताधिक्याने निवडून देऊन लोकसभेत पाठवूया असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील इस्लामपूर, आष्टा, बागणी, बावची येथे आयोजित भाजप बूथप्रमुख, सुपर वॉरियर्स, शक्ती केंद्रप्रमुख व भाजप प्रमुख पदाधिकारी संवाद मेळाव्यात ते बोलत होते. माजी खासदार निवेदिता माने, जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, पृथ्वीराज पवार, लोकसभा निवडणूकप्रमुख सत्यजित देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (शिंदे गट) आनंदराव पवार, माजी मंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक, हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी, भीमराव माने, प्रसाद पाटील उपस्थित होते.