सोलापूर जिल्ह्यात पाण्याची तीव्र पाणी टंचाई जाणवते. अशातच आता यावर्षी पावसाचे कमी प्रमाण यामुळे धरणातील पाणीसाठा देखील घटत आहे. सहा महिन्यांत उजनी धरणातील तब्बल ५४ टीएमसी पाणी संपले असून सध्या १५ दिवसाला धरणातील पावणेदोन टीएमसी पाणी संपत आहे. दुसरीकडे सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारा औज बंधारा तळ गाठत आहे.त्यातील पाणी ३० मेपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी संपूर्ण सोलापूर शहराचा पाणीपुरवठा पाच दिवसाआड केला जाणार आहे.