प्रणिती शिंदेंनी विठ्ठलाचं दर्शन घेऊन नामदेव पायरीवर फोडला प्रचाराचा नारळ

सातत्याने सोलापूर लोकसभा मतदारसंघात झालेल्या पराभवामुळे आता कॉंग्रेसने मंदिराकडे धाव घेतली असून आज  प्रणिती  शिंदे (Praniti Shinde)  यांनी विठ्ठल मंदिरात (Vithal Mandir)  देवदर्शन घेतले . यानंतर नामदेव पायरी येथे महाविकास आघाडीच्या सहकाऱ्यांसोबत नामदेव पायरी येथे प्रचाराचा नारळ फोडला. यापूर्वीही सुशीलकुमार शिंदे यांनी प्रत्येकवेळी आपला उमेदवारी अर्ज विठ्ठलाच्या पायावर ठेवून मग उमेदवारी दाखल केली होती .

आता उद्या प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यापूर्वी मतदारसंघातील 7 मंदिरात नारळ फोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याची सुरुवात विठ्ठल मंदिरापासून केली असून यानंतर मार्डी येथील यमाई माता, बाळे येथील खंडोबा, अक्कलकोट येथील स्वामी समर्थ , हत्तूर येथील सोमेश्वर, सोलापूर येथील मार्कंडेय, सिद्धेश्वर मंदिर आणि राम मंदिरात आज प्रणिती शिंदे प्रचाराचा नारळ फोडणार आहेत.