हातकणंगले लोकसभा मतदारसंघात प्रचारांचा धुरळा सुरू आहे. इंडिया आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी काँग्रेस कमिटीची आज गुरुवारी सायंकाळी चार वाजता बैठक आयोजित केलेली आहे.
या बैठकीत तालुक्यातील राजकीय परिस्थिती ज्या गावात ताकद आहे ती कायम ठेवायची आणि जिथे कमी पडते तिथे जोर लावायचा या तयारीने जोडण्या लावण्याची रणनीती या बैठकीत ठरणार आहे. या बैठकीचे आयोजन आम. राजूबाबा आवळे यांनी केले आहे.
या बैठकीला इंडिया आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर, माजी आ. डॉ. सुजित मिणचेकर, माजी आ. राजीव आवळे, जि. प. पं. स. चे प्रमुख, गावचे सरपंच बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
