अलीकडे अनेक ठिकाणी पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. काल दिवसभरात हातकणंगले, आळते आणि मजले परिसरांत वळवाच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला.
पावसाने कोठेही नुकसानीचे वृत्त नाही. सकाळपासूनच काळे ढग दाटून आले होते. थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने पावसाने आळते, मजले, हातकणंगले येथे हजेरी लावली.