इस्लामपूर विधानसभेमधून धैर्यशील माने यांना मताधिक्य देणार! राहुल महाडिक

नानासाहेब महाडीक शैक्षणिक संकुल पेठ नाका येथे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील प्रमूख पदाधिकारी, कार्यकर्ते, संकुलातील सर्व कर्मचारी वृंद यांची प्रचार नियोजन बैठक पार पडली.

कार्यकालांतील पाच वर्षांपैकी कोरोना मुळे तीन वर्षे निधीच नसतानाही उपलब्ध झालेल्या उर्वरीत दोन वर्षात खा. धैर्यशील माने यांनी आपल्या मतदारसघा साठी मागेल तिथे लागेल तेवढा निधी दिला आहे. येणाऱ्या काळांत आणखीन निधी आणून परिसराचा सर्वांगिण विकास साधायचा असेल तर धैर्यशील माने यांच्यासारखाच अभ्यासू व धडपडणारा खासदार संसदेत असणे गरजेचे आहे त्यामुळे खा. माने यांच्या विजयांसाठी सर्वांनी कोणतीही कसूर न ठेवता जातीनिशी प्रयत्न करण्याचे आवाहन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडीक यांनी केले.