पोटच्या मुलाला घरातून उचलून नेऊन उत्तर प्रदेश येथील भराईच येथे खून केला असल्याचा आरोप रतन दिलीप यादव (शेरेवाडी, ता. आटपाडी) यांनी केला असून त्यांच्यावर ३०२ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करावा अन्यथा २९ एप्रिलपासून आटपाडी पोलिस ठाण्यासमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे. या अगोदरच आटपाडी पोलिस ठाण्यात दीपककुमार ऊर्फ बाळू पांडुरंग शिंदे व विलास पांडुरंग शिंदे यांच्यावर आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. त्यांनी निवेदनात म्हटले आहे, माझ्या घरी माझे पती दिलीप विठोबा यादव व लहान मुलगा प्रशांत दिलीप यादव राहत आहे.
२९ फेब्रुवारी २०२४ रोजी माझा मोठा मुलगा सुशांत यादव याचा खून, दीपककुमार ऊर्फ बाळू पांडुरंग शिंदे व विलास पांडुरंग शिंदे, रा. दिघंची व त्याचे सहकारी यांनी उत्तर प्रदेश येथ नेऊन खून केला व आटपाडी पोलिस स्टेशनमध्ये ३ मार्च २०२४ रोजी गुन्हा दाखल केला आहे. दुबार पोस्टमार्टम रिपोर्टनुसार त्याच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आहेत, असे तपास अधिकाऱ्याने कोर्टात दिलेल्या म्हणण्यामध्ये आहे, आरोपीवर ३०२ कलमासह त्याला मदत करणारे सहआरोपी यांना लवकर अटक व्हावी.