वाळव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची २७ रोजी सभा…..

हुतात्मा संकुलाच्या गौरव नायकवडी यांच्या कामाची नोंद महाराष्ट्र घेईल. २७ एप्रिल रोजी वाळवा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे, असे प्रतिपादन वारणा शिक्षण व उद्योग समूहाचे प्रमुख आमदार विनय कोरे यांनी केले.
हुतात्मा साखर कारखाना कामगार भवन प्रांगणात झालेल्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते.

व्यासपीठावर सम्राट महाडिक, सी. बी. पाटील, शिवाजीराव माने, महादेव कांबळे, लोकनियुक्त सरपंच संदेश कांबळे, उमेश घोरपडे, बाजीराव नायकवडी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी निमंत्रक गौरव नायकवडी होते. शिवाजीराव माने यांनी आभार मानले. संवाद मेळाव्यास हुतात्मा संकुलाच्या कार्यक्षेत्रातील सर्व गावचे कार्यकर्ते उपस्थित होते. हुतात्मा संकुलाचे वैभव नायकवडी मात्र अनुपस्थित होते.