आटपाडी नगरपंचायतीचा मनमानी कारभार थांबवा; ब्रह्मानंद पडळकर

आटपाडी नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराला चाप लावण्याच्या अनेक दिवसांपासूनच्या मागणी आहे. जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी गुरुवारी नगरपंचायतचे मुख्याधिकारी वैभव हजारे यांची भेट घेत सर्व कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. यावेळी नगरपंचायतमध्ये हजर होते. तर अनेक कर्मचारी अद्याप आले नव्हते. त्यांना वेळेचे भान नसल्याचे जाणवल्याने त्यांनी कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले.


गुरुवारी ब्रह्मानंद पडळकर यांनी कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतल्यानंतर दुपारनंतर नगरपंचायत क्षेत्रात व शहरातील मुख्य बाजारपेठ, ओढा पात्रातील पूल याठिकाणी नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी विद्युत खांबावर बल्ब बसवण्यास सुरुवात केली होती. यावेळी विनायक पाटील, जयवंत सरगर, विष्णू अर्जुन, महावितरणचे अभियंता संजय बालटे, चंद्रकांत काळे, चंद्रकांत दौडे उपस्थित होते. यावेळी वैभव हजारे यांचेच कर्मचारी ऐकत नसल्याचे निदर्शनास आले. यावेळी नगरपंचायतमधील गोपनीय गोष्टी बाहेर कशा काय पडताहेत? असा सवाल करत इशारा दिला.