यळगूड येथे नारळाच्या झाडावर वीज कोसळली

वळवाच्या पावसापूर्वी यळगूड (ता. हातकणंगले) येथील अल्लानूर बागवान यांच्या घरानजीकच्या नारळाच्या झाडावर वीज पडल्याने झाडाने पेट घेतला. काही वेळातच सुरू झालेल्या वळवाच्या पावसामुळे ही आग विझल्याने पुढील अनर्थ टळला. नारळाच्या झाडाला लागलेली आग पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. यळगूडचे ग्रामदैवत श्री हनुमान यात्रेचा बुधवारी मुख्य दिवस होता. त्यामुळे गावात सर्वत्र मोठ्या प्रमाणात धामधूम सुरू होती.

यादरम्यान सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास विजेचा जोरदार कडकडाट सुरू झाला. त्यातच वादळी वारे सुटल्याने गावात सर्वत्र पळापळ सुरू झाली होती. अशी सर्वत्र धांदल सुरू असतानाच विजेचा मोठा आवाज झाला. तेवढ्यात रामनगर परिसरातील अल्लानूर बागवान यांच्या घरानजीकच्या नारळाच्या झाडावर वीज पडल्याने झाडाने पेट घेतला.

यळगूड येथील अल्लातूर बागवान यांच्या घरानजीकच्या नारळाच्या झाडाने पेट घेतला होता. झाडावर बुधवारी वीज पडल्यान
यादरम्यान जोरदार पाऊस सुरू झाल्याने ही आग विझली. दरम्यान, या घटनेचे फोटो सोशल मिडीयामधून फिरत होते.