माढा लोकसभेत धैर्यशील मोहिते पाटील आणि धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांच्या रुपाने भाजपला हादरे बसल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्टिव्ह मोडवर आले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच अकलूजमध्ये सलग तीन सभा घेणार आहेत. शिवाय, सभा घेण्यापूर्वीच फडणवीसांनी अकलूजमध्ये काँग्रेसला खिंडार पाडलंय. महायुतीच्या रविवारी (दि. 27) होणाऱ्या सभेसाठी मोहिते पाटील कुटुंबातील डॉ धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील हे उपस्थित राहणार आहेत.