सुलतानगादे (ता. खानापूर) येथे श्री दख्खनचा राजा जोतिबा देवाची यात्रा दि. २८ ते ३० एप्रिलपर्यंत होणार आहेत. २८ एप्रिल रोजी श्री दख्खनचा राजा जोतिबा देवाच्या सासनकाठ्या व पालखीची भव्य मिरवणूक होणारआहे. या मिरवणुकीत हत्ती व घोडे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहेत. रविवारी संध्याकाळी कोल्हापूर येथील प्रसिद्ध अशा सप्तसूर ऑर्केस्ट्राचे गावामध्ये आयोजन करण्यात आले. सोमवारी २९ एप्रिल रोजी बारा गावच्या बारा अप्सरा हा मनोरंजनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मंगळवारी ३० एप्रिल रोजी भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. यात्रेसाठी परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन दख्खनचा राजा यात्रा कमिटी, ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांच्यावतीने करण्यात आले आहे.