५ मे रोजी खरसुंडी सिद्धनाथाचा सासनकाठी सोहळा

संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ देवाची चैत्री यात्रा सासनकाठी सोहळा व पालखी रविवारी (५ मे) होणार आहे.

ग्रामपंचायत, देवस्थान ट्रस्ट व प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.यात्रेचे नियोजन करण्यासाठी तहसीलदार सागर ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठका झाल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात यात्रा होत असून सध्या प्रचंड असे ऊन यामध्ये भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

खिलार जनावरांची यात्रा चैत्री यात्रेमध्ये जनावरांची यात्रा भरविण्याचे नियोजन झरे रोडवरील चिंचाळी हद्दीत केले आहे. यात्रेकरिता पाण्याचे नियोजन ग्रामपंचायत, देवस्थान ट्रस्ट, कृषी उत्पन्न बाजार समिती व भाविकांच्या वतीने करण्यात येणार आहे.