अखेरच्या टप्प्यात प्रचार टोकाला! यंत्रणा गतिमान

लोकसभा निवडणुकीच्या तयारीत प्रत्येक पक्ष आपापली मोर्चेबांधणी करताना दिसतच आहेत.परंतु जसजसे मतदान जवळ येत आहे तसतशी नेतेमंडळी, कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तशी प्रचार यंत्रणा कमालीची गतिमान होत आहे.

नेत्यांच्या सभा बैठकांचा जोर वाढला असून, प्रचारासाठी कार्यकत्यांनी आणि उमेदवारांच्या कुटुंबातील व्यक्तींनी अक्षरश: पायाला भिंगरी बांधली आहे. त्यामुळे प्रचार टोकाला गेला आहे.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्याकडे चालला आहे. कार्यकर्त्यांच्या बैठका वाढू लागल्या आहेत. प्रचारासाठी आता केवळ हाताच्या बोटांवर मोजण्याइतके दिवस राहिले असल्यामुळे उमेदवारांबरोबर प्रचार यंत्रणा गतिमान झाली आहे.

लोकसभा मतदारसंघाचा विस्तार मोठा असल्यामुळे सांभाळणा-यांची देखील दमछाक होत असते. मतदारसंघातील घराघरांत गावांपर्यंत चिन्ह पोहोचविण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. गावागावांत रिक्षासह अन्य वाहनांवरून प्रचार सुरू आहे. त्यासाठी दोन्ही आघाड्यांकडून मोठ्या प्रमाणात वाहने घेण्यात आली आहेत.