सोलापूर लोकसभेच्या काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारानिमित्त सोलापुरातील कर्णिकनगर येथे उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा पार पडली. त्यावेळी आमदार प्रणिती शिंदेंनी भाजपचा १० वर्षातील कारभार चव्हाट्यावर आणला.
भाजपला पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने आता अनेकांना गुन्हा दाखल करू, अटक करू, मागील केसच्या फाईली काढू अशा धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रचारसभेत केला. पण आता जनता १० वर्षांतील महागाई, भ्रष्ट्राचार, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या हे प्रश्न विसरलेली नाही, निश्चितपणे त्यांच्या धमक्यांना न घाबरता भाजपला त्यांची जागा दाखवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.