पतंजलीच्या 14 उत्पादनांचे उत्पादन परवाने तत्काळ रद्द…..

उत्तराखंड परवाना प्राधिकरणाने दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचा हवाला देत पतंजलीच्या 14 उत्पादनांचे उत्पादन परवाने तत्काळ रद्द केले. परवाने रद्द केलेल्या 14 उत्पादनांपैकी 13 उत्पादने पतंजलीची उपकंपनी असलेल्या दिव्य योग फार्मसीची आहेत.परवाना प्राधिकरणाने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केलं की, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी दिव्य योग फार्मसीने उत्पादित केलेल्या 13 उत्पादनांचे परवाने रद्द केले गेले आहेत.

पतंजलीच्या खालील उत्पादनांवर कारवाई झाली आहे?

दृष्टी आय ड्रॉप, श्वासारी सुवर्ण, श्वासारी वटी, ब्रोन्कोम, श्वासारी प्रवाही, श्वासारी आवले, मुक्ता वटी एक्स्ट्रा पॉवर, लिपिडोम, बीपी ग्रिट, मधुग्रिट, मधुनाशिनी वटी एक्स्ट्रा पॉवर, लिवामृत अॅडव्हान्स, लिव्होग्रिट, आयग्रिट गोल्ड इत्यादी उत्पादनांवर कारवाई झाली आहे रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेदा कंपनीच्या माध्यमातून पारंपरिक आयुर्वेदिक औषधांच्या विक्रीसाठी कंपनी खोटे दावे करत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे कंपनी कायदेशीर आव्हानांचा सामना करत आहे. या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.