जरांगेंच्या तोंडी फडणवीसांसकट सगळ्यांचे राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याची भाषा!!

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका अद्याप अधिकृतरित्या जाहीर झाल्या नसल्या, तरी या निवडणुकीची राजकीय दिशा दिसू लागताच मराठा आंदोलन मनोज जरांगेंच्या तोंडी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासकट सगळ्यांचेच राजकीय करियर उद्ध्वस्त करण्याची भाषा आली आहे.

मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना सहकार्य करण्याचे आवाहन केल्यानंतर मनोज जरांगे यांनी ती सहकार्याची भाषा स्वीकारण्याऐवजी शिंदे – फडणवीस सरकारला फटकारल्याचे दिसून आले.

देवेंद्र फडणवीसांनी कितीही गणित करू द्या, मी त्यांची सगळी गणितं फेल करणार. तुम्ही मराठ्यांना मूर्ख समजता का?? मी राजकीय वाटेवर आलो, तर तुमचा खेळ खल्लास! मागण्या मान्य करा नाहीतर सर्वांचं राजकीय करियर उद्ध्वस्त करून टाकेन.