आवाडे- हाळवणकर वादाला…….

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दावर आवाडेंनी लोकसभा लढविण्याचे रद्द करून महायुतीचे उमेदवार माने यांना पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांनी ताराराणी पक्षाच्यावतीने मतदारसंघात मेळावे घेऊन प्रचार सुरू केला. गत विधानसभा निवडणुकीनंतर आमदार आवाडे यांनी भाजपला पाठिंबा दिल्यापासूनच आवाडे. हाळवणकर यांच्यात वेळोवेळी कलगीतुरा रंगतो.

मात्र दोघातील शीतयुद्धातून वाढत गेलेल्या मतभेदाचा बुधवारच्या योगी आदित्यनाथ यांच्या सभेत भडका उडाला. मुख्य फलकावर आवाडे वगळता सर्व घटक पक्षांच्या प्रमुखांचे फोटो वापरले होते. त्याचबरोबर परिसरात लावण्यात आलेल्या लहान- मोठ्या डिजिटल फलक, जाहिराती यावरही आवाडेंचा फोटो नव्हता. तसेच दहा व्हीआयपी पाससह रितसर निमंत्रण मिळाले नसल्याच्या कारणावरून आमदार आवाडे हे सभेला उपस्थित राहिले नाहीत.

तसेच महायुतीतील सर्व पक्षांचे ध्वज सभास्थळी होते. त्यामध्येही ताराराणीचा ध्वज नव्हता. या संपूर्ण प्रकारामुळे आवाडे गट नाराज झाला. प्रमुख कार्यकर्त्यांनी आवाडेंना सभेला जाण्यापासून रोखले. तसेच आवार्डेना अज्ञातस्थळी घेऊन जात त्यांचा फोनही बंद ठेवला. याबाबत सुरेश हाळवणकर यांनीच डावलले असल्याच्या समजुतीतून आवाडेंनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. या मानापमान नाट्याची चर्चा मात्र चांगलीच रंगली.