7 मे रोजी कर्मचारी अधिकाऱ्यांना सुट्टी….

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी ४८- हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये दि. ७ मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर इचलकरंजी उपविभाग तसेच सिमेलगतच्या भागातील निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना निवडणुकी दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी तसेच ही सुट्टी साप्ताहिक सुट्टी रद्द करुन देण्यात येऊ नये, असे आवाहन इचलकरंजीच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांनी केले आहे.