आम. आवाडेंशी साधला केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी संवाद!

सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ अनेक नेतेमंडळी दौरे करताना पहायला मिळत आहेत. देशाचे भाजपाचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी आमदार प्रकाश आवाडे, युवा नेते डॉ. राहुल आवाडे यांच्याशी संवाद साधला. ना. अमित शहा म्हणाले, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेच्या निमित्ताने जे घडले याची मला कल्पना आली आहे. तुमच्याबद्दल जे घडले ते बरोबर नाही. तुम्ही अशा घटनांच्याकडे दुर्लक्ष करा, तुम्ही चांगलेच काम करत रहा, योग्यवेळी योग्य निर्णय मी घेईन.

मी दखल घेतलेली आहे, माझ्याकडे नोंद आहे या घटनेची, तुम्ही चांगले काम करत आहात, तुम्ही अधिक जोमाने कामाला लागा, ताकदीने महायुतीचे काम करा, माझ्या कानावर सर्व गोष्टी आल्या आहेत, मी सर्व पाहून घेईन. निवडणूक काळात अशा घटना घडत नसतात पण तुमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही समजावून सांगा, तुमच्या लोकांनाही समजावून सांगा आणि माझा निरोप तुमच्या सर्व कार्यकार्यांना आणि लोकांनाही सांगा. दरम्यान, या संवादानंतर बाकी आम. आवाडे यांनी अतिशय वेगाने प्रचाराची यंत्रणा गतिमान करत खास. धैर्यशील माने यांना निवडून आणण्याचा निर्धार केला आहे.