पूर्ववैमनस्यातून आष्ट्यात तलवार हल्ला!

अलीकडच्या काळात गुन्ह्र्गारीच्या प्रकारात वाढ झालेली पहायला मिळत आहे. आष्टा (ता. वाळवा) येथे पूर्ववैमनस्यातून अजिंक्य ऊर्फ गणेश व उदाजीराव पवार (वय ३५) व अनुज्ञ मोहनराव पवार (वय ३५, दोघेही रा. घोरपडे गल्ली, आष्टा) या दोघांवर फिल्मी स्टाईलने तलवार कोयत्याने हल्ला झाला.

हल्लेखोर टिपू मुजावर (रा. आमणापूर) व त्याचे सहकारी पळून गेले आहेत. ही घटना गुरुवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान घडली. सकाळी आष्टा येथील अजिंक्य ऊर्फ गणेश पवार, तसेच टिपू मुजावर यांच्यात एका व्हिडीओ गेममध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यातूनच सायंकाळी शिक्षक बँकेनजीक टिपूने त्याच्या सहकाऱ्यांनी तलवार हल्ला केला यावेळी अजिंक्य पवार हा आंबेडकर मार्गावरून दत्त मंदिर समोरील चौकातून पळत असताना त्याला टिपू मुजावर व त्याच्या सहकाऱ्यांनी पुन्हा हल्ला चढवला. यावेळी अजिंक्य याला सोडवण्यास गेलेल्या अनुज्ञ पवार याच्यावर ही हल्ला करण्यात आला. तो देखील गंभीर जखमी आहे…