सुहास जांभळे यांची चंदुर येथील पूरग्रस्त भागास भेट


सध्या कोल्हापूर, इचलकरंजीसह चंदुर भागालाही महापुराने विळखा घातला आहे. गावातील सखल भागात पाणी शिरल्यामुळे चंदुर परिसरातील नागरिकांवर विस्थापित होण्याची वेळ आली आहे. अनेक भागात राहत्या घरासह, यंत्रमाग आणि शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या महापूरग्रस्त भागास सुहास जांभळे यांनी भेट देऊन पूरस्थितीची पाहणी केली.
संततधार पावसामुळे इचलकरंजीसह आजूबाजूच्या ग्रामीण भागालाही महापुराचा फटका बसला आहे.

या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे यांनी चंदूर गावातील महापूरग्रस्त भागास रविवारी भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या.

यावेळी नागरिकांनी महापुरामुळे भागात निर्माण झालेल्या समस्या जांभळे यांना सांगितल्या. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन प्रशासनाने योग्य ती कारवाई लवकरात लवकर करावी असा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. सरकारने पूरस्थितीची गंभीर दखल घेऊन महापूरग्रस्तांना भरघोस मदत करावी अशी मागणी त्यांनी केली.