सोमवारी पहाटे ६ ते दुपारी ३ पर्यंत….

चैत्र यात्रेपासूनच्या काळात जोतिबा मंदिर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण होत असते. याची स्वच्छता करण्यासाठी पाकळणीचा विधी आयोजित केला जातो. ६ मे रोजी हा विधी होणार आहे. यानिमित्ताने ६ मे रोजी पहाटे ६ वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी बंद राहील.

श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील पाकळणी सोहळा अर्थात मंदिर आणि परिसराची स्वच्छता सोमवारी म्हणजेच ६ मे रोजी होणार आहे यानिमित्ताने मंदिर व्यवस्थापनाने दर्शन वेळेत बदल केला आहे. याची भाविकांनी नोंद घेण्याचे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केले आहे.