दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला!

हातकणंगले मतदारसंघात वाळवा आणि शिराळा हे सांगलीतील दोन मतदारसंघ येतात. या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार आहेत. जयंत पाटील यांचं या भागात मोठं वर्चस्व आहे. महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीची यंत्रणा सत्यजीत पाटलांसाठी एकजुटीने काम करताना दिसत आहे. जयंत पाटील हे सत्यजीत पाटलांना वाळवा आणि शिराळा या मतदारसंघातून किती लीड देतात यावर बरंच काही अवलंबून आहे.

एकूणच, सुरूवातीला प्रचारात मागे पडलेल्या आणि नंतर मुसंडी मारलेले सत्यजीत पाटील आणि नाराज असलेल्यांची नाराजी दूर करून कामाला लागलेले धैर्यशील माने या दोन शिवसैनिकांतील लढतीमुळे उद्धव ठाकरेंपासून, एकनाथ शिंदे, जयंत पाटील अशा अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांनी सभा घेतल्याने भाजपनेही जास्तीत जास्त मतदान आपल्याकडे कसं खेचता येईल यावर भर दिला आहे.

आता हातकणंगलेकर हे ठाकरेंची मशाल हाती घेतात की शिंदेंचं धनुष्यबाण की राजू शेट्टींची शिट्टी वाजणार हे येत्या 4 जून रोजी समजेल.