वाळवा तालुक्यातील बागणी येथील श्री नागोबा मंदिराचा प्राण प्रतिष्ठापना, कलशारोहण व वास्तुशांती सोहळा बुधवार दि. २५ रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत संपन्न होणार आहे. यावेळी श्री नागोबा मूर्तीची व कुंभकलश मूर्ती भव्य दिव्य पारंपरिक सवाद्यात मिरवणूक सोहळा मंगळवारी दुपारी चार ते सायंकाळी सहापर्यंत गावातील प्रमुख मार्गावरून होणार आहे.
सायंकाळी ६ ते ११ मूर्तीना जलादिवास, धान्यादिवास, शयनादिवास करण्यात येणार आहे. २५ रोजी सकाळी ६ ते ११ पर्यंत पूजापाठ व होमहवन आहे. सकाळी १० ते ११ या वेळेत मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण कार्यक्रम होणार आहे. ष. ब्र. श्री. गुरू १०८ शिवानंद शिवाचार्य वाळवेकर महाराज यांच्या हस्ते सर्व विधी होणार आहेत. तर पौरोहित्य वेदमूर्ती मा. मु. रेवणनाथ शिवलिंग जंगम स्वामी व इतर शास्त्री गण यांच्या हस्ते होणार आहे
