सांगली लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. या मतदारसंघावर राज्याचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीने सांगली लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाला सोडला.ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली, तर काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला.
दरम्यान, आज मतदानादिवशीच भाजपाचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी विशाल पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. यांना नाचता येईना अंगण वाकड, खोटे आरोप केले जात आहे. काहीही नाही, पराभव समोर दिसत आहे म्हणून रडून सगळे प्रयोग सुरू आहे. सकाळी तीन वाजल्यापासून सर्वांना फोन सुरू आहेत, अशी टीका खासदार संजयकाका पाटील यांनी विशाल पाटील यांच्यावर केली.