पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 वर्षीय पिंटीचे (नाव बदलेले) एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. यातून, तिने एका मुलाला जन्म दिला. दरम्यान, या सर्व प्रकरणाची माहिती समजताच पतीने तिला सोडून दिले. त्यामुळे पिंटी मागील काही दिवसांपासून आईकडे म्हणजेच माजलगावला राहत होती. या काळात माजलगावातील ओळखीची असणाऱ्या छायाच्या घरी पिंटीचे येणेजाणे सुरु झाले. विशेष म्हणजे याचवेळी किशोर भोजने नावाचा व्यक्तीची पत्नीही नांदत नसल्याने तो देखील अधूनमधून छायाकडे येत होता. यावेळी त्याची पिंटीसोबत ओळख झाली आणि त्याने तिच्या 1 वर्षांच्या मुलाला आपले नाव दिले.
दरम्यान, यावेळी छायाने पिंटीला दुसरे लग्न लावून देण्याचे आमिष दाखविले होते, तर तिचे मूल कोल्हापुरातील ललिता नावाच्या महिलेच्या मदतीने विक्री करण्याचा प्लॅन आखला. विशेष म्हणजे ललिता मुलं विकण्याचा व्यवसाय करत होती. त्यानुसार तिने आपल्या प्रियकराच्या मदतीने ग्राहक शोधला आणि साडे तीन लाखात मुलाला विकले. मात्र, याची माहिती मिळताच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने कारवाई करत बाळाची सुटका केली आहे. तसेच पाच आरोपींना बेड्या देखील ठोकल्या आहेत.
आरोपींचे नावं…
छाया श्रीराम देशमुख (वय 38 वर्षे, रा. शाहूनगर, माजलगाव), किशोर वासुदेव भोजने (वय 32 वर्षे, रा. बुलढाणा), ललिता मनोहर भिसे (वय 38 वर्षे, रा. हातकणंगले जि. कोल्हापूर), दीपक गव्हाळकर ऊर्फ गवळी (रा. बेळगाव, कर्नाटक) आप्पा राघोबा केरकार (वय 65 वर्षे), नामदेव फोडू सावंत (वय 60 वर्षे) व स्वप्नजा महादेव जोशी (वय 38 वर्षे, सर्व रा. सत्तरी, उत्तर गोवा) अशी आरोपींची नावे आहेत. यातील दीपक व ललिता हे दोघे फरार असून, त्यांचाही शोध पोलिस घेत आहेत.