शिवकालीन युद्धकलेला शासकीय मान्यता मिळायला हवी; शाहू छत्रपती महाराजांची अपेक्षा

शिवकालीन युद्धकलेला शासकीय मान्यता मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी येथे व्यक्त केली. जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित राज्यस्तरीय शिवकालीन युद्धकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

सुमारे तेवीस वर्षांनंतर कोल्हापुरात ही स्पर्धा झाली. छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये कार्यक्रम झाला. शाहू छत्रपती महाराज म्हणाले, ‘‘शालेय अभ्यासक्रमात मर्दानी खेळ अर्थात शिवकालीन युद्धकलेचा समावेश होता. कालांतराने तो त्यातून हद्दपार झाला. या खेळात मुलींचा सहभाग वाढत आहे, ही चांगली गोष्ट आहे‌. या खेळाला शासकीय मान्यता कशी मिळेल, यासाठी प्रयत्न केला पाहिजे.’’

जिल्हाधिकारी राहूल रेखावार म्हणाले, ‘‘भारतीय युद्धकला शिकण्यासाठी विदेशातून खेळाडू यायला हवेत. ही कला महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली आहे. युवा पिढीने ती आत्मसात करावी.’’ या वेळी लखन जाधव व राम यादव यांनीही मनोगत व्यक्त केले. शाहीर मिलिंद सावंत यांनी गीत सादर केले.

‘केएसए’चे सचिव माणिक मंडलिक, नंदकुमार बामणे, आदित्य बेडेकर, प्रमोद पाटील, सुखदेव गिरी, वस्ताद पंडित पोवार, नंदकुमार बामणे, प्रवीण हुबाळे, शस्त्र संग्राहक संदीप सावंत, बाबासाहेब पोवार, उदय गायकवाड उपस्थित होते. स्पर्धेत मुख्य पंच म्हणून प्रविण आयवळे, संतोष सुतार, तर पंच म्हणून दिलीप जाधव, योगेश गुंजीकर, श्रीकांत खोत, विवेक कदम, अतुल शिंदे, अवधूत घाटगे, धनाजी सलगर, गणेश कदम, प्रविण हुले, प्रसाद देवणे, संदिप जाधव, सुरज केसरकर, धनाजी पोवार, प्रसाद कदम, योगेश पाटील, विक्रम शिंदे, उमेश कोडोलीकर यांनी काम पाहिले.

स्पर्धेचा निकाल असा

  • प्रथम – सव्यासाची गुरुकुलम (गारगोटी)
  • द्वितीय – श्रीमंत योगी मर्दानी खेळ आखाडा (पाडळी खुर्द)
  • तृतीय – सह्याद्री प्रतिष्ठान (कोल्हापूर)
  • उत्तेजनार्थ – राजे मर्दानी आखाडा (पाचगाव)
  • शिस्तबद्ध – शिवगर्जना मर्दानी आखाडा

उत्कृष्ट खेळाडू

  • – वैभव मोहळ (श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडा, पुणे)
  • – दीप्ती पाटील (खंडोबा तालीम मंडळ)