आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर भिडणार गुजरात आणि चेन्नई

आयपीएल 2024 मध्ये (IPL 2024) गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (GT vs CSK) शुक्रवारी आमनेसामने येणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी इंटरनॅशनल स्टेडियमवर (Narendra Modi Stadium, Ahmedabad) संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होईल.

चेन्नई सुपर किंग्जने 11 पैकी 6 सामने जिंकले आहेत, तर 5 गमावले आहेत. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील संघ 12 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने 11 पैकी केवळ 4 सामने जिंकले असून 7 सामने गमावले आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघ 8 गुणांसह गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहे.

दरम्यान, गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपित केला जाईल. मोबाईलवर, जिया सिनेमा ॲपवर तुम्ही हा सामना विनामूल्य पाहू शकता.