शहापूर येथील भीम मॅरेथॉन कमिटीतर्फे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धा रविवारी (ता. १२) गावाचावडीमागे मराठी शाळा शहापूर येथून पहाटे साडेपाच वाजता सुरू होणार आहे.
छत्रपती चौक शहापूर ते पंचगंगा साखर कारखान्यापर्यंत (७ किलोमीटर) राहणार आहे. सहभागी स्पर्धकांसाठी खुला व वयानुसार गट केले आहेत. तरी शहर व परिसरातील स्पर्धकांनी भाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे केले आहे.
रविवारी इचलकरंजीत मॅरेथॉन स्पर्धा….
