आटपाडी शेजारच्या पार्टीमध्ये आमच्याशी का वाद घातला, असे म्हणत शेरेवाडी (ता. आटपाडी) येथे पती-पत्नीस मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवार, दि. ७ रोजी रात्री आठ वाजता घडली. याबाबत अनिल नामदेव बोराडे (वय ५०, रा. शेरेवाडी) यांनी महेश जगन्नाथ वीरकर, गणेश जगन्नाथ इरकर, सुवर्णा जगन्नाथ इरकर, जगन्नाथ सदाशिव इरकर (सर्व रा. शेरेवाडी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी अनिल बोराडे व त्यांची पत्नी मनीषा घरी असताना हल्लेखोरांनी हातात लाकडे दांडके घेऊन ‘शेजारच्या जेवणाच्या पार्टीमध्ये माझ्याशी का वाद घातला’ असे म्हणत मारहाण व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
यावेळी पत्नी मनीषा भांडणे सोडवण्यासाठी गेली असता तिलाही मारहाण केली. यामध्ये अनिल यांच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. किरकोळ कारणातून झालेल्या या हाणामारीमुळे परिसरातील वातावरण तंग बनले होते. अनेकांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र इरकर कुटुंबीयांनी फिर्यादी अनिल बोराडे व त्यांची पत्नी मनीषा घरी असताना त्यांना घरात घुसून दांडक्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.