राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा जोर चांगलाच वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या पावसाचा काही भागात शेती पिकांना (Agriculture Crop) देखील फटका बसत आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाचा यलो अलर्ट (Yellow alert) जारी करण्यात आलाय. दरम्यान, या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार (Imd), राज्याच्या विविध भागत अवकाळी पाऊस (Unseasonal rain) पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, कोकणातील काही भागात जोरजार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. कोकणातील रायगड, रत्नागिर आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळं या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्रातही काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.
