शहापूर येथे सर्पदंशाने सर्पमित्राचा मृत्यू!

इचलकरंजी शहापूर येथील जे. के. नगर येथे काल मंगळवारी रात्री सर्पमित्र स्वप्नील रघुनाथ शहापुरे वय. 33 या सर्पमित्राचा सर्पदंशाने मृत्यू झाला. स्वप्निल याला शहापूर येथून फोन आल्यानंतर तो तातडीने घटनास्थळी जाऊन त्याने सर्प पकडण्यास सुरुवात केली. घोणस हा विषारी साप असल्याने स्वप्नील याने सावधगिरीने पकडले मात्र या सापाने त्याला दंश केला.

घटनास्थळी असलेल्या मित्रमंडळींनी स्वप्निल याला सांगली शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्वप्नील याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.