आजपासून कोळा गावचे ग्रामदैवत श्री लक्ष्मी देवीच्या यात्रेस प्रारंभ

उन्हाळ्याच्या दिवसात अनेक गावच्या यात्रा भरविल्या जातात. भाविक देखील यात्रेसाठी भरपूर गर्दी देखील करतात. तर
सांगोला तालुक्यातील कोळा येथील महाराष्ट्र कर्नाटक लाखो भाविक भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या ग्रामदैवत श्री लक्ष्मी देवीच्या यात्रेस प्रारंभ होत आहे. कोळा ग्रामपंचायत यात्रा कमिटी मंदिर समितीच्याच्या वतीने यात्रेचे योग्यप्रकारे नियोजन केले आहे.कोळा पंचक्रोशीचे श्रद्धास्थान असलेल्या लक्ष्मीदेवीच्या यात्रेस सुरुवात सोमवार दि. २०/०५/ २०२४ सुरुवात समस्त मानकरी यांच्या उपस्थितीत यात्रेस प्रारंभ होणार आहे.

या दिवशी माळी व रामोशी समाजाचा नैवद्य. मंगळवार दि. २१/०५/२०२४ रोजी करांडे (पुजारी) मंडळी यांचा नैवद्य. बुधवार दि. २२/०५/२०२४ रोजी समस्त गावकरी यांचा नैवद्य ( मुख्य दिवस).बुधवार दि. २२/०५/२०२४ रोजी रात्रौ १२ वा. श्री लक्ष्मी देवीची भव्य पालखी मिरवणूक ( सबीना).

गुरुवार दि. २३/ ०५/२०२४ रोजी दुपारी ४ वा. जंगी कुस्त्यांचे मैदान. बुधवार रात्री बारा वाजता लक्ष्मीदेवीची भव्य दिव्य पालखी मिरवणूक सोहळा लक्ष्मीदेवी मंदिरापासून मुख्य चौकातून महादेव मंदिरा पर्यंत जाणार आहे. देवीचा छबिना कार्यक्रम होणार आहे. भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन केले आहे. १८ मे पासून जनावराच्या यात्रेस प्रारंभ होणार आहे. मंदिर समिती व यात्रा कमिटी यांच्याकडून सांगण्यात आले. लक्ष्मी देवीची यात्रा यशस्वी पार पाडण्यासाठी कोळा ग्रामपंचायत कोळा, लक्ष्मी देवी ट्रस्ट, लक्ष्मी देवी यात्रा कमिटी, शासकीय कर्मचारी पोलीस बांधव यांच्यासह सर्व नेतेमंडळी पदाधिकारी ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.