इचलकरंजीत कृष्णा योजनेसाठीच्या जलवाहिनी बदलण्याचे काम सुरू

इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न हा खूपच जगजाहीर आहेच. पाण्यासाठी नागरिकांचे अतोनात हाल देखील होत आहेत. इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा योजनेच्या सक्षमीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील जलवाहिनी बदलण्याचे काम सुरू आहे. यासाठी आज आणखी अर्ध्या किलमीटर इतकी जलवाहिनी उत्पादक कंपनीकडून उपलब्ध झाली आहे. त्यामुळे या योजनेच्या कामाला आता अधिक गती येणार आहे.

या योजनेच्या कामाबाबत विरोधी गटांने प्रश्न उपस्थित केले होते. तिसऱ्या टप्प्यात एकूण साडेपाच किलो मिटरची जलवाहिनी बदलण्यात येणार आहे. यामध्ये मजरेवाडी उपसा केंद्राचा परिसर, शिरढोण -टाकवडे मार्ग आणि शहरात टाकवडे वेस ते जलशुद्धीकरण केंद्र या तीन टप्प्यात नविन जलवाहिनी टाकण्यात येणार आहे.

सुरुवातीला उत्पादन कंपनीकडून जलवाहिनी मिळत नसल्याची तक्रार मक्तेदार कंपनीने केली होती. यामुळे हे काम रखडले होते. याबाबत विरोधकही आक्रमक झाले होते. मात्र, आज पुन्हा ५४८ मीटर इतकी जलवाहिनी येथे दाखल झाली आहे. आता शहरात आणि मजरेवाडी अशा दोन्ही ठिकाणी एकाचवेळी जलवाहिनी टाकण्याचे काम गतीने केले जाणार आहे.