सोलापूरसह सांगली जिल्ह्यात सध्या दुष्काळाची (Drought) भीषण परिस्थिती आहे.अशातच हातातील फळबागा जपण्यासाठी शेतकरी अतोनात प्रयत्न करताना दिसत आहे. अशातच नीरा उजवा कालव्याचे सुरु झालेले पाणी अचानक बंद झाले. ज्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याने आपल्या दीड एकर द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवली आहे.
नीरा उजवा कालव्यात फलटण भागात गळती झाल्याने, सुरु असलेले पाण्याचे आवर्तन बंद करण्यात आले आहे. ज्यामुळे या शेतकऱ्याने द्राक्ष बाग (Drought) तोडण्याचे हे टोकाचे पाऊल उचलेले आहे.समाधान ढोणे असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कासेगाव येथील रहिवासी आहेत.
दरम्यान, कालवा दुरुस्तीनंतर पुन्हा आवर्तन देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. मात्र, दुष्काळामुळे (Drought) द्राक्ष बाग जळू लागल्याचे पाहून संतापलेल्या शेतकऱ्याने आपल्या द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवली आहे. दीड एकर द्राक्ष बाग तोडल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.