लखनऊ विमानतळावर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका तरुणाला अटक केली आहे. दुबईहून आलेल्या या व्यक्तीवर चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई करण्यात आली आहे. या व्यक्तीकडून 601.80 ग्रॅम सोनं जप्त करण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे, या व्यक्तीने प्रायव्हेट पार्टमध्ये सोनं लपवलं होतं. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत 36.93 लाख असल्याचे सांगण्यात येत आहे.
सोमवारी दुबईहून लखनऊ विमानतळावर हा व्यक्ती पोहोचला होता. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना या व्यक्तीवर संशय आला त्यानंतर विमानतळावर त्याची तपासणी करण्यात आली. मात्र, तपसणीदरम्यान त्याच्याजवळ काहीच आढळले नाही. मग कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा X-Ray काढला. त्यानंतर त्याच्या गुद्द्वारेत 601.80 ग्रॅम सोन्याची पावडर आढळून आली. त्यानंतर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.
कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास लखनऊ येथे पोहोचत असलेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात असलेल्या एका प्रवाशांकडे सोनं असल्याची माहिती इंटेलिजन्स युनिटला मिळाली होती. त्यानंतर इंटेलिजन्स युनिटने कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. विमान लखनऊमध्ये पोहोचताच अधिकाऱ्यांनी सर्व प्रवाशांची तपासणी करण्यास सुरुवात केली. यादरम्यान एका व्यक्तीकडे सोनं असल्याचा संशय अधिकाऱ्यांना आला. तेव्हा त्याचे स्कॅन करण्यात आले. तेव्हा त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सोनं लपवलं असल्याचं समोर आले.
या व्यक्तीने सोन्याची पेस्ट तयार करुन ते हुशारीने लपवण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी हे सोनं कुठून आलं याबाबत चौकशी केली असता त्यांनी कोणीतीही समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. तसंच कोणती कागदपत्रेही उपलब्ध करुन दिली नाहीत. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत 36 लाख 93 लाख इतकी आहे. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची कस्टम ड्युटीदेखील भरण्यात आली नव्हती.
सोन्याची तस्करी करण्यासाठी लोक जे प्रकार अवलंबवत आहेत ते पाहून कस्टम विभागाचे अधिकारीही चक्रावले आहेत. याआधीही परदेशातून सोन्याची तस्करी करण्यात आल्याचे प्रकार घडले होते. यापूर्वी वाराणसी विमानतळावरदेखील दुबईतून आलेल्या एका व्यक्तीकडून 38 लाखांचे सोने कस्टम विभागाने जप्त केले होते. या व्यक्तीनेही प्रायव्हेट पार्टमध्ये सोने लपवले होते. एअरपोर्टवर स्कॅनिंगदरम्यान हे सोनं असल्याचे समोर आले होते. त्यानंतर डॉक्टरांच्या मदतीने हे सोनं बाहेर काढण्यात आलं.