Ichalkaranji Crime : एक वर्षाच्या मुलीला ठार मारण्याची धमकी देत विवाहितेवर लैंगिक अत्याचार; बाप-लेकावर गुन्हा दाखल

सध्या गुन्हेगारी प्रकारात खूपच वाढ झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. खुन, मारामारी, फसवणूक, चोरी याबरोबर सध्या महिला असुरक्षितता देखील निर्माण झाली आहे. एक वर्षीय मुलीला ठार मारण्याची धमकी देत विवाहितेवर लैंगिक अत्याचार व विनयभंग केल्याप्रकरणी बाप-लेकांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.वीरेंद्र विलास गणबावले व विलास गणबावले (दोघे रा. भारतमाता हौसिंग सोसायटी) अशी त्यांची नावे आहेत.

याप्रकरणी वीरेंद्र गणबावले याला पोलिसांनी अटक केली आहे.त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. संशयित वीरेंद्र याने पीडितेच्या घरी जाऊन तिच्या एक वर्षीय मुलीला ठार मारण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केला. तर, विलास याने पीडित महिलेशी लगट करत तिचा विनयभंग केला. पीडितेच्या फिर्यादीवरून गणबावले बापलेकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.