स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पिंपळे निलख परिसरातील एका स्पा सेंटरवर धाड टाकून देहविक्री करणाऱ्या तीन मुलींची सुटका केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, काहीजण स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवत आहेत.. अशी गोपनीय माहिती अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कशाला मिळाली, त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पिंपळे निलख परिसरातील ब्रह्मानंद कॉलनी इंगवले नगर येथिल फ्लॅट नंबर 201 येथे जे पी फॅमिली स्पा सेंटरवर धाड टाकली.
या धाडीमध्ये पोलिसांनी स्पा सेंटरमध्ये देहविक्री करणाऱ्या तीन मुलींची सुटका केली आहे. तसेच या प्रकरणात स्पा चालक जया अशोक जाधव आणि निखिल मोहन नवघन या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींविरोधात सांगवी पोलीस स्टेशनमध्ये भादवि कलम 370, 34, अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 चे कलम तीन, चार, पाच आणि सात नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.