सेवानिवृत्त धारकांनी हयात दाखले पंचायत समिती सांगोला येथे त्वरित द्यावेत : अध्यक्ष वसंतराव दिघे

सेवानिवृत्त धारकांनी आपली हयात दाखले पंचायत समिती सांगोला येथे देणे गरजेचे आहे परंतु अद्याप अनेक सेवानिवृत्त कर्मचारी यांनी हयात दाखले दिले नाहीत त्यांनी सोमवार १८ डिसेंबर अखेर पंचायत समिती सांगोला येथे दाखले द्यावेत अन्यथा त्यांचा पगार निघणार नाही तरी द्यावे असे सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष वसंतराव दिघे यांनी आवाहन केले आहे.

तसेच १७ डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता बचत भवन सांगोला येथे पेन्शनर डे साजरा करावयाचा आहे तरी त्यासाठी सर्व सेवानिवृत्त धारकांनी उपस्थित रहावे असे आवाहन सेवानिवृत्त शिक्षक दिनकर घोडके यांनी केले आहे.