सोलापूर येथे नोकरीचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक….

नोकरीचे आमिष दाखवून १४ लाख ८६ हजाराची फसवणूक केल्याप्रकरणी दोघा जणाविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना (दि.३१) डिसेंबर २०२२ पासून ते आजतागायत कित्तूर चन्नम्मा नगर विजापूर रोड सोलापूर येथे घडली आहे.याप्रकरणी कांताराम श्रीराम पाटील (वय ५९, रा. जय महालक्ष्मी नगर मजरेवाडी जवळ जुळे सोलापूर) यानी प्रियंका सुरज चव्हाण तसेच सुरज रमेश चव्हाण (रा. दोघेही कित्तूर चन्नम्मा नगर विजापूर रोड सोलापूर) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी कांताराम पाटील हे वर्तमानपत्र वाचत असताना एनटीपीसी भरती म्हणून आलेल्या नोकरीविषयक जाहिरातीमध्ये बीई मेकॅनिकल, डिझेल मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, डिप्लोमा डिग्री, आयटीआय इलेक्ट्रिकल, फिल्ड इंजिनिअर कम्युनिकेशन केलेल्या उमेदवारांची भरतीसाठी म्हणून आलेली जाहिरात पाहून त्या ठिकाणी दिलेल्या संपर्क क्रमांकावर फिर्यादी हे बी.ई मेकॅनिकल झालेल्या त्यांच्या मुलासाठी म्हणून जाहिरातीमध्ये दिलेल्या संबंधीत मोबाईलवर संपर्क केला. त्यानंतर यातील आरोपी चव्हाण पती-पत्नी यांनी फिर्यादीस त्यांच्या राहत्या घरी चित्तूर चन्नम्मा नगर या ठिकाणी मीटिंगसाठी बोलावले.फोनपेवर पैसे पाठवलेफिर्यादी व त्यांचा मुलगा असे दोघे त्यांच्या घरी सांगितल्याप्रमाणे गेले असता वरील आरोपीने फिर्यादीस तुमच्या मुलास नोकरी लावतो त्याबद्दल १५ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.

तसेच तुमच्या मुलास नोकरी लागल्यानंतर ट्रेनिंग काळात ३० ते ८० हजार रुपये इतका पगार मिळेल, असेही सांगितले. फिर्यादी आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी सांगितलेल्या खात्यावर वेळोवेळी ९ लाख रुपये पाठवले.फिर्यादीस उडवा उडवीची उत्तरेथोड्या दिवसानंतर नोकरीबाबत विचारणा केली असता आरोपीनी मुंबई मंत्रालयातील सचिव यांच्याशी बोलणे झाले असल्याचे सांगून बाकीचे राहिलेले पैसे पाठवा असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी प्रियंका चव्हाण यांच्या फोनपेवर वेगवेगळ्या तारखेस पैसे पाठवले. असे एकूण १४ लाख ८६ हजार रुपये आरोपींना दिले. त्यानंतर फिर्यादीनी नोकरी संदर्भात वेळोवेळी विचारणा केली असता दोघे पती-पत्नी फिर्यादीस उडवा उडवीची उत्तरे दिली.त्यानंतर अनेक वेळा फोन केला असता त्याने फोन उचलला नाही. दिलेले पैसे मागतात आज देतो उद्या देतो, अशी उत्तरे ते आजतागायत देत आहेत. या सर्व प्रकारावरून फिर्यादीना आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्याने त्यानी संबंधित पती-पत्नी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.