सध्या सगळीकडेच दिंड्यांचे पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. आषाढी वारी ही सर्वात मोठी वारी मानली जाते. यानिमित्त अनेक भक्त वारकरी हे दिंडी आपल्या गावातून घेऊन ते पंढरपूरकडे प्रस्थान करीत असतात. अनेक गावी या दिंडींचे मुक्काम देखील केला जातो. अनेक गावांमध्ये पंढरीची पायी दिंडीचा सोहळा अनुभवायला मिळत असतो. असाच अदूतपूर्व सोहळा विटांमध्ये पार पडला.
अविरत वारकरीसेवेचा वारसा जपणारे कुटुंब म्हणजेच पाटील कुटुंबीय. पंढरीची वारी म्हणजे एक समृद्ध करणारा अध्यात्मिक अनुभव आषाढी एकादशी निमित्त श्रीक्षेत्र रामलिंग बेट बहे ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे विटा येथे आगमन झाले. तेव्हा संपूर्ण पाटील कुटुंबीयांच्या वतीने दिंडीचे आदरातित्य व अभूतपूर्व असे स्वागत करण्यात आले.
माऊलींच्या अश्वाचे पूजन करून मनोभावे दर्शन देखील घेतले. माऊलींचे नामस्मरण करून मोठ्या भक्ती भावाने व पवित्र वातावरणात संपूर्ण पाटील कुटुंब यामध्ये रमले यावेळी आदर्श शैक्षणिक संकुल परिसरात अत्यंत दिमाखदार व डोळ्याचे पारडे फेडणारे असे रिंगण झाले.
यामध्ये श्री वैभवदादा पाटील सौ. प्रतिभाताई पाटील सौ. प्रणितीताई पाटील व सौ. जयश्रीताई पाटील यांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन वारकरी सेवेची परंपरा जपली व वारकऱ्यांची सेवा केली. याची संपूर्ण मतदारसंघात चर्चा होत आहे. विठ्ठल रखुमाईच्या गजरात संपूर्ण विटा परिसर दुमदुमून गेला.