नागेवाडी येथे जुगार अड्ड्यावर छापा

अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत
विटा ; नागेवाडी (ता. खानापूर ) येथे तीनपानी जुगार खेळणाऱ्या अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून २ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. जुगार खेळणाऱ्या सात जणांना ताब्यात घेतले. राजेंद्र रावसो निकम (वय ५९) शंकर गंगाराम यादव (५०) , अविनाश वसंत लोहार (२९), नानासो जयसिंग निकम (६१), रवींद्र बबन झांबरे (४४),प्रशांत शिवाजी देशमुख (५५), सुरेश गणपत कोळी (५०,सर्व नागेवाडी , ता. खानापूर ) अशी त्यांची नावे आहेत. पोलिस महेश वसंत देशमुख यांनी फिर्याद दिली.

ही कारवाई काळ दुपारी साडेचारच्या सुमारास करण्यात आली. वरील सातजण दुचाकीवरून नागेवाडी गावाच्या हद्दीत घाडगे-पाटील ढाब्याच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत येऊन बेकायदा , बिगर परवाना तीनपानी जुगारात पैसे लावून खेळत होते. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस पथकांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकला. सातजणांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सहा दुचाकी, सात मोबाईल,रोख पाच हजार चाळीस रुपये मिळून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि न्यालयासमोर हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता केल्याचे पोलिसांनी सांगितले.